Saturday, June 24, 2017

IndiaDekho

आलो परत...
पुण्यातून बडोदा 550 किमी
बडोद्याहून अजमेर 640 किमी...अजमेर ला रात्री अकरा ला पोहोचल्यावर...अजमेर च्या सुनसान गल्ल्यामधून गाडी चालवत ख्वाजाजी च्या दर्ग्यात...मध्यरात्र ते पहाट... शांत वातावरणात लोबन आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध... तीन तास झोपून पुन्हा सकाळी अजमेर ते आग्रा 380 किमी जाताना वाटेत चांद बावडी ही स्थापत्यशास्त्राचा चमत्कार असणारी विहीर...मग पहाटे उठून ताजमहाल...आणि हलद्वानी कडे प्रवास..

वाटेत बुलदंशहर, अलिगढ, मुरादाबाद, रामपूर ही शहर...त्या गावातील लोकांना थेट पुण्यावरून मोटारसायकल वर आलो याचं वाटणारं आश्चर्य आणि आमच्याबरोबर असणाऱ्या महिला बाईकस्वारांच वाटणारं अप्रुप!!!

लँड्सलाईड झाल्यामुळं अचानक रस्ता बदलावा लागला. ढाब्यावर उत्तराखंड चा नकाशा उघडून आता कुठे जायचे हे ठरवायचं...त्या गावात पोचल्यावर राहायला हॉटेल शोधायचं...असा प्रवास....

थोडेफार चुकलो, चिंब भिजलो, थंडीने गारठलो...आणि खरं सांगायचं तर किर्रर्र जंगलातून रात्री जाताना घाबरलो सुद्धा...

राणीखेत ला दर्ग्याच्या उरुसला गेलो...हृषीकेश ला गंगेच्या आरतीला गेलो...लांसडाऊन ला चर्च मध्ये गेलो...

कुठेही खाल्लं... काहीही खाल्लं...धाबे, गल्लीतल्या टपऱ्या ते हाय फाय हॉटेल ...सगळीकडे...

त्यातही शिकंजी, बेलाच्या फळाचा रस आणि बुलदंशहर व्रजघाट परिसरातील उसाचा रस लाजवाब...

3380 किलोमीटर, 6 राज्य, 14 दिवस (त्यातील पहिल्या 4 दिवसात 1800 किमी)...
6 बाईकस्वार (त्यात 4 महिला) आणि एक भन्नाट ऑर्गनाईजर Nitin Joshi

सह्याद्री ते हिमालय... सर्वच अचाट!